kru su pra krishnakumarpradhan@gmail.com bhashabharatikavitaye: जुलाई 2016

शनिवार, 23 जुलाई 2016

ranjale gaanjale

भूमातेच्या अंकी निजलो
प्रसंगी पावसातही भिजलो ,
आम्ही भूमातेची लेकरे,
 पाहुनी तुम्हा फेपरे  १


क्वचित काळी दयाबुद्धीने ,
पुण्य मिळविण्याच्या इच्छेने
शिळेपाके जरी असेल गोड़ हे,
तरी अन्नाचे घास थोड़े ,
देता ,आणि म्हणता वरती ,
कशास आली पीडा नसती ,२


वस्त्रे जीर्ण झालेली ती
तुम्हा कधी जी नाही घालायची ,
गाठोडी बांधून आमुच्या माथी ,
मारुनी स्वतःला उदार म्हणविता '३


नको जीवन हे लाजिरवाणे ,
दोष नसता दुसऱ्यावर अवलंबणे ,
प्रलय किंवा अग्नितांडव ,
येईल तेव्हां सर्व सारखे ४
-krishnakumarpradhan



शुक्रवार, 22 जुलाई 2016

sfurtigaan45(contd)

sfurtigeet ४५(पुढे चालू )मनमाझे विसावले रे
प्रौढांचे समतोल समीक्षण तरुणांचे वाहक संवेदन
बालांचे ते विभूतिपूजन छेडिता तंतू हे स्वर घुमले रे ।४।
येथ सुरांची नसे सुरावट लटक्या शब्दांची नच वटवट
दांभिकतेची तात्विक लटपट बोलते हृदय हे जळते रे ।५।
आयुष्याचे गीतच गमले त्यागाच्या रागात गायिले
कर्तव्याचे सूरच सगळे गंभीर उरी  वरवर हसले रे ।६।
हळू हळू हृदयात प्रकटली अनंत रूपे गीतामधली
हृदयाहृदयी एकच झाली ते गीतच जीवन बनले  रे ।७।

source स्फुर्तीगान भाग १ 

view sourceprint? 1