आलंहाददायक वारे जेव्हां सुखविती मना ,
गुढी ऊभारुन नववर्षाचे स्वागत करुं या वाटे जना
कोकीळ आपुल्या मंजुळ स्वरे बोलावितो तिला,
तेव्हां समजावे धरणीवरती वसंत अवतरला
विचार करणे ठाऊक नसते आमुच्यासारखे पक्षयांना ,
पण जाणीव कोठेतरी अंतरी सांगत असते त्यांना ,
हीच वेळ खरी समागमाची नातर हिल काय '
अंडी घालण्या उशीर होईल,घरटे उसने मिळेल काय,
मिळेल तरी ते असेल काऊचे ,पाऊस पडता वाहणार ,
उघड्यावरती पडता पिले आपली ,माऊ तोंडी जाणार
हा दूरचा विचार जरीका आपणास ना सुचणार
निसर्ग देतो जरी ना बुद्धी ,नेणीव पक्ष्या रुपणार
कृ ष्ण कु मार प्रधानः